Sport

अमळनेर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

अमळनेर (पंकज शेटे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , पंचायत समिती अमळनेर व क्रीडा महासंघ अमळनेर आयोजित शासकिय शालेय तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा तालुका क्रीडा संकुल अमळनेर येथे संपन्न झाल्या .या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील कुस्तीपटुनी १४/१७/१९ वयोगटातील स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेची चुरस वाढविली.

या स्पर्धेचे उद्घाटन बलवान शक्तीचे दैवत बजरंग बोली प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून , मैदानाची पुजन व श्रीफळ वाढुन केले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन तहसिल आॕफिस अमळनेर चे नायब तहसिलदार श्री प्रशांत धमके साहेब होते. यावेळी अमळनेर न .पा चे माजी नगरसेवक श्री. प्रताप आबा शिंपी , माजी नगरसेवक श्री संजय पाटील पहेलवान , श्री विश्वास पाटील पहेलवान , श्री महेश पाटील सर , व्हाॕलीबाॕल सचिव डाॕ. प्रा.देवदंत्त पाटील सर ,टिनु बोरसे पहेलवान , बापुराव सांगोरे सर , स्वप्नील पाटील सर, रत्ना सोनवणे मॕडम ,इ मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रस्तावित क्रीडा समन्वयक सुनिल वाघ सर यांनी केले .

पंच म्हणून महेश माळी , मनोज पाटील ,योगराज चौधरी , के आर बाविस्कर, बापुराव सांगोरे, ,यांनी तर गुणलेखक म्हणून स्वप्नील पाटील , आर ए घुगे , जयेश मासरे ,एच आर बाविस्कर ,विनायक सुर्यवंशी, दर्शन पाटील सर , योगेश पाटील सर यांनी केले .

सूत्रसंचालन व आभार क्रीडाशिक्षक व संयोजक श्री. सुनिल वाघ यांनी मानले विजय स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी स्पर्धेक जिल्हास्तरावर तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button