नंदगाव येथे विद्युत खांबावरील तारांची चोरी

नंदगाव येथे विद्युत खांबावरील तारांची चोरी
जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील नंदगाव येथे अज्ञात चोरट्यांनी खांबावरील विद्युत तारांची चोरी केल्यांची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की
जळगांव तालुक्यातील घटना याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदगाव ता.जळगांव येथील प्रगतिशील शेतकरी .साहेबराव सुका चांभार याच्या मालकीची गट नंबर 135/2 व गट नंबर 140 असे दोन नंदगावातील शिवारात शेती क्षेत्र आहे.त्याच्या शेतामध्ये गट नंबर 156/1 त्र्यंबक भावजी सोनवणे यांच्या शेताच्या डीपी वरून गट नंबर 156/2/अ , गट नंबर 135/2 , गट नंबर 140 , व श्री.धिरेंद्र एकनाथ जाधव गट नंबर 141 यांच्या शेता पर्यंत इलेक्ट्रिक पोल जोडलेले होते.मागील 2 ते 3 वर्षांत अशीच चोरी झाली होती,,
ही शासकीय मालमत्ता असल्याने याची तक्रार सदरील शेतकऱ्याने म.रा.वि.मंडळ च्या कर्मचाऱ्यांना कळविले होते.परंतु त्यांनी या कडे दुर्लक्ष करत कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिस प्रशासनास दिली नव्हती .परत तशीच चोरीची पुनरावृत्ती होऊन दिनांक 11 जानेवारी रोजी रात्री सदरील शेतकऱ्याच्या शेतातूनच शासकीय मालमत्तेची 2 इलेक्ट्रिक पोल व ॲल्युमिनियम विद्युत वाहक 360 मिटर तारेची जबरी चोरी झाली आहे.
चोरी ही शेतकऱ्याच्या मुलाला लक्षात आल्याने संबधित गावातील वीज कर्मचारी चंद्रकिरण सोनवणे यांना फोन वरून कळविले असता त्याने कनिष्ठ अभियंता ललित नारखेडे यांना सांगितल्याने त्यांनी घटनास्थळी पडताळणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले, याबाबत जळगांव तालुका पोलीस स्टेशन ला अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील या जबरी चोरीचा तपास हे.काँ. डी. डी.चौधरी हे करीत आहे.