दुचाकी चोरणारी जोडी एलसीबीच्या जाळ्यात, २ दुचाकी हस्तगत

महा पोलीस न्यूज । दि.२९ एप्रिल २०२५ । जळगाव शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या जोडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून २ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरात दि.१६ एप्रिल रोजी पंकज सरदार राजपुत रा.पिंप्राळा, जळगाव याचे मालकीचे हिरो शाईन तसेच दि.१६ एप्रिल रोजी दुपारी अब्दुल फारूक खलील देशमुख रा.फातिमा नगर, जळगाव यांची हिरो होंडा शाईन जळगाव येथुन चोरी झाली होती. याबाबतीत जळगाव शहर पोलीस स्टेशन आणि जीआरपी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे उघडकीस येणे कामी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सूचना केल्या होत्या.
२ दुचाकी हस्तगत, रेकॉर्डवर नसलेले गुन्हेगार
एलसीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली कि, मन्यारखेडा गावातील मयुर उर्फ गोल्या बाबुलाल सांळुखे, रामचंद कमलचंद भिल यांनी दुचाकी चोरल्या आहेत. माहितीच्या आधारे दोघांना मन्यारखेडा येथून ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे कबुल करुन चोरी केलेल्या २ दुचाकी काढून दिल्या आहेत. गुन्हेगारी रेकॉर्ड नसताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी दोन्ही गुन्हे उघड केले आहेत.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेढे, अतुल वंजारी, पोलीस हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, हरिलाल पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन, प्रदीप चौरे, नेत्रमचे पोकॉ. कुंदनसिंग बयास यांनी अशांनी केली आहे.