पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त व्ही.पी. होले महाविद्यालयात स्वच्छता अभियान

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त व्ही.पी. होले महाविद्यालयात स्वच्छता अभियान
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त)जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त एक दिन, एक घंटा, एक साथ स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला यात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय परिसर व ओरियन सी.बी.एस.ई स्कूल परिसर आणि महाविद्यालयीन परिसर स्वच्छ करण्यात आले. सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी स्वच्छतेला लागले आणि पूर्ण परिसर स्वच्छ करून कचरा एका ठिकाणी गोळा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉअशोक राणे, एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ युवाकुमार रेड्डी, उपप्राचार्य डॉ केतन चौधरी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा आकाश बिवाल राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला प्रकल्प अधिकारी डॉ पुनम जमदाडे डॉ.गणेश पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उपस्थित राहून परिसराची स्वच्छता केली .






