Crime
लक्ष्मी नगरात तरुणाची आत्महत्या; आईच्या परतल्यानंतर घटना उघड

लक्ष्मी नगरात तरुणाची आत्महत्या; आईच्या परतल्यानंतर घटना उघड
जळगाव (प्रतिनिधी): कानळदा रोडवरील लक्ष्मी नगरात २५ वर्षीय सचिन उर्फ रामेश्वर लक्ष्मण भोई याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (८ जुलै) सकाळी उघडकीस आली. सचिनची आई मंगलाबाई आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरहून परतल्यानंतर ही घटना समोर आली.सचिन एका मार्केटमधील कपड्याच्या दुकानात काम करत होता आणि आईसोबत राहत होता.
त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मंगलाबाई घरी परतल्यानंतर सचिनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेमुळे लक्ष्मी नगरात शोककळा पसरली आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत असून तपास सुरू आहे.