Social

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! ४० हजारांपर्यंत कर्ज

मुंबई महापोलीस न्यूज l १२ मे २०२५: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ४० हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी सरकार सक्रियपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑगस्ट २०२४ पासून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत या योजनेचा दहावा हप्ता वितरित झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी सुमारे ४५ हजार कोटी रुपये खर्च करते. हप्त्यामध्ये थोडासा विलंब झाला तरी विरोधक योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवतात. मात्र, ही योजना कधीही बंद होणार नाही.

कर्ज सुविधेची नवी घोषणा
अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी नवीन प्रस्ताव मांडला आहे. ते म्हणाले, “आम्ही जिल्ह्यातील बँकांशी संवाद साधून लाभार्थ्यांना ४० हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. काही सहकारी बँका यासाठी पुढे येत आहेत. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून वळता केला जाईल.” या सुविधेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी मिळणार आहे

मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडकी बहीण योजनेपासून प्रेरणा घेऊन महायुती सरकारने ही योजना महाराष्ट्रात लागू केली. गेल्या निवडणुकीत या योजनेमुळे महायुतीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता. यंदाच्या निवडणुकीतही लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे

.महिलांसाठी सक्षमीकरणाचा पुढचा टप्पा
लाडकी बहीण योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला आहे. आता कर्ज सुविधेच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण आणि राज्याच्या विकासाला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लाडक्या बहिणींचा उत्साह
या घोषणेमुळे राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या या पावलामुळे लाडक्या बहिणींच्या आकांक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. महायुती सरकारच्या या प्रयत्नांना जनतेचा पाठिंबा मिळत असून, ही योजना आणखी यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button