श्रीक्षेत्र भडगाव ते श्री क्षेत्र भद्रा मारुती पायी यात्रा

श्रीक्षेत्र भडगाव ते श्री क्षेत्र भद्रा मारुती पायी यात्रा
चार वर्षापासून भडगाव येथील तरुण करतात पायी यात्रा
मार्गक्रमण करत असताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला सत्कार
भडगाव (प्रतिनिधी)भक्तांना पावणार निद्रिस्त अवस्थेतील महाराष्ट्र राज्यातील एकुलता एक मारुती म्हणजे खुलताबाद येथील भद्रा मारुती. खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान या तीर्थक्षेत्रासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्रा मारूती या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे.
या या क्षेत्राला गेल्या चार ते पाच वर्षांपासून भडगाव येथून भाविक चार दिवसाची पायी यात्रा करत दर्शनाचा लाभ घेतात.श्रीक्षेत्र भडगाव ते श्री क्षेत्र भद्रा मारुती पर्यन्त भडगाव येथील तरुणांनी गेल्या चार वर्षांपासून अखंड पायी यात्रा काढत आहे. हि यात्रा उद्या शनिवार रोजी भद्रा मारुती येथे पोहचणार आहे. भडगाव येथील भद्रा मारुती भक्त प्रवीण ऊर्फ पप्पू पाटील, रवींद्र पाटील, बंटी पाटील आधी भाविक गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याने पायी यात्रा काढत आहे. यावर्षी पायी यात्रा काढत असताना ते भडगाव च्या पुढे पायी चालत असताना आमदार किशोर आप्पा पाटील हे रस्त्याने मार्गक्रमण करत होते यावेळी या भाविकांना पाहून आमदारांनी स्वतः गाडी थांबवत त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील संजय पाटील सुधाकर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
असा आहे दिंडीचा मार्ग
भडगाव नगरदेवळा नागद सायगव्हाण कन्नड वेरूळ भद्रा मारुती असा चार दिवसांचा पायी प्रवास करून ते दर्शनाचा लाभ घेणार आहेत