PoliticsSocial

सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील

बसस्थानकात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल-आ.अनिल पाटील

बसस्थानकात विकास कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

अमळनेर:-सुरवातीला एस टी डेपोतील वर्कशॉप व इतर विकासकामांसाठी आठ कोटी निधी मिळाल्याने ती कामे जवळपास पूर्णत्वास आली आहे,आता पुन्हा अडीच कोटी निधीतून संपूर्ण आगारत पेव्हर ब्लॉक आणि रंगरंगोटीची कामे होणार असल्याने येत्या सहा महिन्यात अमळनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेला दिसेल अशी भावना माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते अमळनेर बसस्थानकातील विविध विकासकामांच्या द्वितीय टप्प्याचा भव्य भूमिपूजन सोहळा दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते.

प्रवाशांच्या सोयी-सुविधांना नवी दिशा देणाऱ्या या कार्यक्रमात असंख्य मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.अमळनेर मतदारसंघात दुष्काळ असल्याने आमदार पाटील यांनी सत्कार स्वीकारणे टाळून शेतकरी बांधवाप्रती सदभावना व्यक्त केली.पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामिण जनतेसाठी एस टी चे महत्व किती याची कल्पना मला आहे कारण माझी स्वतःची आई दररोज याच एस टी ने आपल्या गावी शेतात जात असते.याआधी बस डेपोची बरीच दुरावस्था असताना राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आठ कोटी निधी मिळविला.त्यातून पार्किंग परिसर दुरुस्ती वर्कशॉप नूतनीकरण, मॅनेजर ऑफिस,मॅनेजर निवासस्थान नूतनीकरण आदी कामे मार्गी लागून जवळपास पूर्णत्वासही आलीत.त्यानंतर बस आगाराकडे लक्ष वेधून याठिकाणी संपुर्ण परिसरात काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक व रंगरंगोटी साठी अडीच कोटी निधी मिळविला त्याचेही प्रत्यक्ष काम आज सुरू झाले आहे.
याशिवाय अमळनेर बस आगारात 100 बसेस ची आवश्यकता असताना केवळ 90 बसेस उपलब्ध होत्या त्यातील बहुतांश दुरावस्था झालेल्या होत्या.त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करून 20 ते 22 नवीन बसेस उपलब्ध झाल्या असून अजून किमान 50 नवीन बसेस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यासोबतच बस स्थानकावरून अगदी हाकेच्या अंतरावर नवीन प्रशासकीय इमारत व पंचायत समिती इमारतीचे काम पूर्णत्वास येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बस ने आल्यानंतर पायीच सर्व शासकीय कार्यालयात जाऊन तेथील काम आटोपून सोबतच बाजारही जवळ असल्याने तेथून खरेदी करून बसने लवकर घरी पोहोचू शकेल हेच माझ्यासाठी समाधान असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी मंचावर माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील,मार्केट सभापती अशोक पाटील,मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,शहराध्यक्ष चेतन राजपूत,सौ रिता बाविस्कर,कामगार नेते एल टी पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे,भाजपचे ऍड व्ही आर पाटील, शीतल देशमुख, उमेश वाल्हे, शहराध्यक्ष योगेश महाजन,शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील,माजी शहर प्रमुख संजय पाटील,आगार व्यवस्थापक राकेश शिवदे,वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने,वरिष्ठ लिपिक तुषार साळुंखे, अमोल पाटील यासह राष्ट्रवादी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,आजी माजी नगरसेवक,शेतकी संघ व मार्केटचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच सर्व रापम कर्मचारी व युनियन पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर यांनी केले.

विद्यार्थ्यांना दिला भूमीपूजनाचा मान

यावेळी बस स्थानकात मोठ्या संख्येने ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित असल्याने आमदारांनी त्यांना सन्मानाने बोलावून त्यांच्या हस्ते भूमीपूजनाचे नारळ वाढविण्यात येऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button