
अमळनेर | पंकज शेटे – अमळनेर नगरपरिषद अग्निशामक विभागात शासनाची दिशाभूल करून भरल्या गेलेल्या पदांची तक्रार करून सुद्धा त्यावर कुठलेही करवाई होत नसल्याची बाब समोर आली असून तक्रारदार श्री. परेश रविंद्र उदेवाल यांच्या तक्रार अर्जनुसार अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांना फायरमन कोर्स संदर्भातील कागदपत्रे जमा करायची होती, पण मुख्याधिखारी साहेबांचा आदेशाची पायमल्ली करत कुठलेही कागदपत्र अजूनही अग्निशमक विभागातून सादर केली गेलेली नाही.
तरी येणाऱ्या 10 दिवसाच्या आत जर कुठलेही करवाई मुख्याधिकारी साहेब यांच्याकडून नाही झाल्यास 7 दिवसांचे साखळी उपोषण, मुख्याधिकारी दालनात घंटानाद, किव्हा तोंडावर काळे फासले जाईल,तसेच प्रतिकृती दहन करून निषेध नोंदवला जाईल असे या तक्रार अर्जाद्वारे कळविण्यात आले आहे.






