Other

अमळनेरचे संपादक सुरेश कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान!

अमळनेरचे संपादक सुरेश कांबळे यांना ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान!

पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशन उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते गौरव

अमळनेर, प्रतिनिधी : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत अमळनेर येथील ‘दिव्य खान्देश’ वृत्तपत्राचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष सुरेश हिरामण कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशन २०२६’मध्ये दि. १० रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

या अधिवेशनाला पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे आणि खान्देश सरचिटणीस डॉ. विजय गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते सुरेश कांबळे यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुरेश कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेने कार्य करताना समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सामाजिक हित आणि विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. त्यांची कार्यशैली, पत्रकारितेप्रती असलेली बांधिलकी आणि समाजोपयोगी योगदान यांची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले.

या सन्मानामुळे अमळनेरच्या पत्रकारिता क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सुरेश कांबळे यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह अमळनेर आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button