Other

भुसावळात ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा जल्लोष

भुसावळात ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा जल्लोष

१६ शहरांतील संघांमध्ये रंगणार चुरस

भुसावळ | प्रतिनिधी

नेवे-वाणी समाज मंडळ, भुसावळ यांच्या वतीने रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आली असून, यावल रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सकाळी ६ वाजल्यापासून क्रिकेटचा थरार रंगणार आहे. समाजातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजबांधवांमध्ये ऐक्य वाढविणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे.

स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता होणार असून, दिवसभरात तब्बल ३१ सामने खेळविले जाणार आहेत. अंतिम सामन्यानंतर रात्री ८ वाजता बक्षीस वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप होईल.

महाराष्ट्रासह दोन राज्यांतील संघांचा सहभाग

या स्पर्धेला महाराष्ट्रातील विविध शहरांसह मध्यप्रदेश आणि गुजरातमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भुसावळ, जळगाव, यावल, साकळी, पुणे, मुंबई, यवतमाळ, रिंगणगाव, चुंचाळे आदी ठिकाणांबरोबरच मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर आणि गुजरातमधील सुरत येथील संघांनीही सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे स्पर्धेला आंतरजिल्हा आणि आंतरराज्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा हा क्रीडा महोत्सव ठरणार असल्याने भुसावळ व परिसरातील समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किशोर गजानन नेवे, उपाध्यक्ष दिपक हरिभाऊ नेवे, सचिव राम सुधाकर माहूरकर तसेच महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी रविवारी दिवसभर रंगणारी ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button