Other

अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर पतीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर पतीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील लडगाव येथे १५ वर्षे ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या पतीविरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३९/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कलम ४ व ६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, फिर्यादी हिचे वय १५ वर्षे ६ महिने असून ती शेतमजुरी करते. तिचा सुमारे वर्षभरापूर्वी अजय कैलास अहिरे याच्यासोबत प्रेमविवाह झाल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. विवाहानंतर ती पती व सासरच्या मंडळींसोबत राहत होती.

गर्भवती झाल्यानंतर सातव्या महिन्यात ती धुळे जिल्ह्यातील आई-वडिलांकडे गेली होती. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिला हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिची प्रसूती झाली व तिने एका बाळाला जन्म दिला.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आधारकार्डावरील जन्मतारखेनुसार तिचे वय १५ वर्षे ६ महिने असल्याचे समोर आले आहे. जन्मतारखेबाबत तिच्या आई-वडिलांना अचूक माहिती नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले आहे.या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. गुन्ह्याचा प्रथम खबर अहवाल न्यायालयाकडे पाठविण्यात आला असून, विशेष अहवाल जळगाव नियंत्रण कक्षाला ई-मेलद्वारे पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे यांनी केली आहे.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button