Other

अमळनेरच्या क्रीडा शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

अमळनेरच्या क्रीडा शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात सन्मान

अमळनेर….नुकत्याचअहिंल्यानगर येथे संपन्न झालेल्या छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय 6वे ग्रामीण साहित्य संमेलन व “राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२६” संपन्न झाला.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील कवी , लेखक , गायक , ग्रामीण साहित्यीक , पोवाडाकार , लावणी सम्राट , प्रबोधनकार अश्या क्षैत्रातील मान्यवंर उपस्थित होते.
ग्रामीण संस्कृती जपण्यासाठी ग्रामीण साहित्य जपणे व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधुन महाराष्ट्र शैक्षणिक व विविध क्षैत्रात कार्य करण्यां-या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्काराने शाल , श्रीफळ , बुके , सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
द्रौ रा कन्या शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक एस पी वाघ यांना (छ.संभाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार) ,, हिरालाल रमेश बाविस्कर सर के पी सनेर माध्यमिक विदयालय जैतपीर येथील क्रीडाशिक्षक ( राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार ) ,  गोकुळ विक्रम बोरसे स्व. सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा हायकुलचे क्रीडा शिक्षक यांना ( गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार ) देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानीत करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वाकडुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button