Social
राहुल बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा युवती मंचच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड

राहुल बडगुजर यांची अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा युवती मंचच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड
अमळनेर प्रतिनिधी ;- सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात समाज अखिल भारतीय स्तरावर समाज जनहितार्थ सामाजिक कार्य करणाऱ्या अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा युवती मंचच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावरून राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात,
त्या अनुषंगाने तालुका व जिल्हा राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रशांत बडगुजर व संस्थापक अध्यक्ष अमित बडगुजर यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरातून राहुल बडगुजर यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र राहुल बडगुजर यांना देण्यात आले असून या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






