मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊ वाटप
भाजप कामगार आघाडीचा उपक्रम; वाचन संस्कृतीतून आदर्श नागरिक घडविण्याचा संदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊ वाटप
भाजप कामगार आघाडीचा उपक्रम; वाचन संस्कृतीतून आदर्श नागरिक घडविण्याचा संदेश
जळगाव | प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप जिल्हा कामगार आघाडीच्या वतीने रेमंड कॉलनी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ मध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरित करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात सुमारे ६० विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांवरील पुस्तके, वह्या आणि खाऊचे वितरण करण्यात आले. आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विकसित आणि प्रगतिशील भारत घडविण्यासाठी युवा पिढीने राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनचरित्रांचे वाचन केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते. वाचन संस्कृती ही सक्षम विद्यार्थी आणि आदर्श नागरिक घडविण्याचा भक्कम पाया असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला माजी उपमहापौर सुनील खडके, नगरसेविका वंदना इंगळे, नगरसेविका रंजना वानखेडे, संयोजक पितांबर भावसार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष इंगळे, जिल्हा पदाधिकारी विजय वानखेडे, मनोज भांडारकर, माजी मंडळ अध्यक्ष सुनील सरोदे, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव, हर्षल इंगळे, सुदर्शन चालसे, मनोज निंबाळकर, भारत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप चौधरी यांच्यासह महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ च्या मुख्याध्यापिका अश्विनी अंबाड, उपशिक्षिका सविता पालवे, उपशिक्षिका ज्योती काकडे आणि अन्य शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.






