अमळनेर खा. शि. मंडळाच्या निवडणुकांसाठी रंगीत मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात

अमळनेर ( पंकज शेटे) : खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रिवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष होण्यासाठी यावर्षी खास काळजी घेतली जात असून मतदारांच्या यादीत नाव, फोटो, मोबाईल क्रमांक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बोगस मतदानास आळा बसणार आहे.
मतदार यादीचे काम राजकुमार छाजेड यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी हे काम काटेकोरपणे पूर्ण केले असून यादी प्रकाशनापूर्वी दुरुस्तीसाठी सोमवारी प्रताप कॉलेजच्या सचिवांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अनेकांनी आपापले नाव तपासले.
या प्रसंगी प्रसाद शर्मा, प्रवीण देशमुख , भरत पवार, कमल कोचर, कॉलेजचे सचिव पराग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मतदार यादीचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.






