Other

सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

सीए शाखेचे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व पदयात्रा

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश

जळगाव | प्रतिनिधी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या जळगाव शाखेतर्फे सनदी लेखापाल दिनानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि पदयात्रेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना सनदी लेखापाल, विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उपक्रमाची सुरुवात जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाने झाली. यावेळी जळगाव सीए शाखेचे अध्यक्ष सीए रोशन रुणवाल, तत्काळ माजी अध्यक्ष सीए हितेश आगीवाल, माजी अध्यक्ष सीए अभिषेक कोठारी, वरिष्ठ सदस्य सीए आर. डी. जैन तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. शाखेच्या पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि सनदी लेखापालांनी परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण केले.

यानंतर खान्देश सेंट्रल मॉल ते सीएम भवन अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत अध्यक्ष सीए रोशन रुणवाल, उपाध्यक्ष व सीए विद्यार्थी शाखा अध्यक्ष सीए सोहन नेहेते, कार्यकारी मंडळ सदस्य सीए लक्ष्मीकांत लाहोटी, सीए सभासद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी सीए रोशन रुणवाल यांनी सनदी लेखापाल दिनानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रम समाजाशी नाते अधिक दृढ करणारे असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव वाढविणारे असल्याचे सांगितले. या उपक्रमांमुळे १ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या ७८ व्या सनदी लेखापाल दिन उत्सवाला उत्साहपूर्ण सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव सीए शाखेच्या व्यवस्थापन समिती, पदाधिकारी आणि सीए विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button