Social

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप
अमळनेर: राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळवाटप करण्यात आले.


वर्धापन दिन केवळ औपचारिकरीत्या साजरा न करता, रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा आणि त्यांना आरोग्यदायी लाभ मिळावा या उद्देशाने महासंघाने हा सामाजिक उपक्रम राबवला. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील विविध कक्षांमध्ये जाऊन तेथील रुग्णांची आस्थेने चौकशी करण्यात आली व त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. महासंघाच्या या उपक्रमाचे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी मनापासून आभार मानले.

या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमळनेर शहर व तालुक्याचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महासंघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे अमळनेर शहरात व परिसरात कौतुक होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button