Other

चोपडा तालुक्यात ‘मोतीबिंदूमुक्त अभियान’; सोमवारपासून नेत्र तपासणी

चोपडा तालुक्यात ‘मोतीबिंदूमुक्त अभियान’; सोमवारपासून नेत्र तपासणी

४ डिसेंबरपर्यंत गावोगावी शिबिरे; तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज

जळगाव, प्रतिनिधी : रावेर आणि यावल तालुक्यांतील यशस्वी अभियानानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे सोमवार, २६ ऑक्टोबरपासून ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ अभियानाला सुरुवात होत आहे. या अभियानांतर्गत ४ डिसेंबरपर्यंत चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ नेत्ररोग डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली आहे.

गावोगावी होणार नेत्र तपासणी

चोपडा तालुक्यातील दृष्टीदोष आणि मोतीबिंदूची समस्या असलेल्या नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून गावोगावी नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून, गरजू रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

नेत्र तपासणी शिबिरांचे वेळापत्रक

२६ ऑक्टोबर : धानोरा, मोहरद, बीडगाव

२८ ऑक्टोबर : अडावद, सुटकर, खुर्डी

३० ऑक्टोबर : वड्री, मंगरुळा, वडली

२ नोव्हेंबर : विश्णापूर, अडगाव, विरवाडे

४ नोव्हेंबर : नागलवाडी, वराड, गणापूर

१३ नोव्हेंबर : चांदसणी, कमलगाव, पंचक

१६ नोव्हेंबर : वैजापूर, देन्हारी, उमर्टी

१८ नोव्हेंबर : सत्रासेन, लासूर, चौगाव

२० नोव्हेंबर : अकुलखेडा, चहार्डी, हातेड

२३ नोव्हेंबर : बुधगाव, अनवरदे, वाळसी

२७ नोव्हेंबर : कुसुना, वेळोदे, वनेदा

३० नोव्हेंबर : खाचगे, कुरवेल, तावसे

२ डिसेंबर : निमगाव, वेले, गरनाड

४ डिसेंबर : कलोबा, कठोरा, वटकर

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार आहे. यामध्ये डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम् भारसाकळे, डॉ. अभिजीत काकड, डॉ. अनीष कांदळगावकर, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. रिया गोरे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. ऋतुजा चव्हाण आणि डॉ. अश्विनी काकडे यांचा समावेश आहे. हे डॉक्टर अभियानांतर्गत रुग्णसेवा देणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

नागरिकांनी तपासणी करून घ्यावी

चोपडा तालुक्यातील दृष्टीदोष किंवा मोतीबिंदूची समस्या असलेल्या नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन नेत्र तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शिबिराबाबत अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी डॉ. कीर्ती महाजन (९१३००७४०९३) किंवा डॉ. रिया गोरे (७७१८८१२०७४) यांच्याशी संपर्क साधावा.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button