Crime
तलवारीसह दहशत माजवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरात तलवार घेऊन फिरत दहशत माजवणाऱ्या एका तरुणाविरोधात पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (२१ जुलै) रोजी संध्याकाळच्या सुमारास जी सेक्टर परिसरात करण्यात आली.
राज सुरेश तायडे (वय १९, रा. पोलिस कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पोलिस नाईक मंदार महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात राज तायडे याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशयित तरुण हा तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत होता. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.