धुळे पोलिसांनी राबविले ऑल आऊट, नाकाबंदी ऑपरेशन गावठी पिस्तुल, चार तलवारींसह गांजा अन् दारु जप्त

धुळे पोलिसांनी राबविले ऑल आऊट, नाकाबंदी ऑपरेशन गावठी पिस्तुल, चार तलवारींसह गांजा अन् दारु जप्त
धुळे प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दि. ३ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेच्या दरम्यान जिल्हाभरात ऑल आऊट, नाकाबंदी ऑपरेशन राबविले, यात एक गावठी पिस्तुलराह नियंत काडतुस, चार तलवारी, गांजा, दास व दोन पाहिजे असलेले संशयित आरोपी पकडण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निलहाभरात ऑल आऊट नाकाबंदी ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, विविध शाखांचे अधिकारी कर्मचारी, अंमलदार यांनी एकत्रितपणे सहा तास ही विशेष मोहीम राबविली. एकूण २३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती, यासाठी २० अधिकारी व ९८ अंमलदार तैनात करण्यात आले होते. या
मोहिमेअंतर्गत अधिकारी कर्मचान्यांनी केलेल्या कारवाईत एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जिवंत काडतूस, चार तलवारी, एक लाख १९ हजार ७३० रुपये किंमतीची १हजार ४२५ लिटर गावठी हातभट्टीची दारु, मोराणे ता. धुळे उड्डाणपुलाखाली गांजा विक्री करताना रवी तारक्या पावरा (१९) रा. चिलारे ता. शिरपूर यास एक लाख ६१ हजार रुपयांच्या गांनासह पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुना दाखल करण्यात आला आहे. तर ११ ठिकाणी जुगार अड्कुधांवर धाडी टाकून ८ हजार ४४५ रुपयांची रोकड व जुगराचे साहित्य जप्त करण्यात आले. यासह विजय वसंत कुंबे-शिदि (३२) रा. सडगाव ता. धुळे व महेश अंबर मोरे (३२) रा. उत्कर्ष कॉलनी वक्री रोड़ धुळे हे दोन पाहिजे असलेले संशयित आरोपी पकडण्यात आले. दोंडाईचा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगार आरीफ उर्फ
काडू शाह महमुद शाह (३२) रा. गौसिया नगर रा. इस्लामपूर दोंडाईचा या दोघा जणांना दोन यपांकरीता धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले असताना ते फिरताना मिळून आले. त्यांच्या विरुध्द गुन्हाव दाखल करण्यात आला आहे यासह १११ मोटार वाहन कायद्यान्वये केसेस करण्यात आला. यात ३७ हजार ७०० रुपयांचा दंड बहनधारकांकडून वसुल करण्यात आला. शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या दुतर्फा रस्त्यावर दारु पिणाऱ्या ११ जणांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. १६ जणांना सोडयाच्या गाडीवर दारु पितांना पकडण्यात आले. ३२४ लहान मोठ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. ८५ बिअर बार, धाये, हाटिल, लॉनेस, गेस्ट हाऊस तपासण्यात आले. यासह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ३८ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. ऑल आऊट नाकाबंदी मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक औकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधीकारी वेळोवेळी अधिकारी कर्मचान्यांना मार्गदर्शन करीत होते. अशाच पध्दतीने वेळोवेळी ऑपरेशन राबवुन कारवाई केली जात राहील, अशी माहिती अधीक्षक धिवरे यांनी दिली आहे.