Crime

चिलम ओढताय.. सुट्टा मारताय.. जळगाव पोलीस गांजा सेवन करणाऱ्यांवर जोरदार कारवाई

महा पोलीस न्यूज । १६ मे २०२५ । जळगाव शहरात गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्याविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी एकाच दिवसात शहरात १३ कारवाई करण्यात आल्या. ही कारवाई अशीच सुरू राहिल्यास गांजा विक्री आणि सेवनला आळा बसणार आहे.

जळगाव शहर पोलीस उपविभागाच्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि परिरक्षावधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली गांजा सेवन करणाऱ्या १३ जणांवर कठोर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली असून, यामध्ये जळगाव शहर (२ प्रकरणे), शनीपेठ (५ प्रकरणे), एमआयडीसी (२ प्रकरणे), जिल्हापेठ (२ प्रकरणे) आणि रामानंदनगर (२ प्रकरणे) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी गांजा सेवन आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी ही मोहीम तीव्र केली असून, यापुढेही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सांगितले. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button