EducationSport

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेधसाठी निवड

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेधसाठी निवड

महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांची निवड चाचणी उत्साहात

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड चाचणी १५ व १६ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या निवड चाचणीत महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण ८९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या निवड चाचणीदरम्यान डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांसाठी अश्वमेध क्रीडा स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.वैद्यकीय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करावी, या दृष्टीने अशा निवड चाचण्यांना विशेष महत्त्व आहे. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मदत होते. विविध महाविद्यालयांतील खेळाडूंना एकत्र येऊन आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी या निवड चाचणीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या निवड चाचणीचे उद्घाटन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टवर फित कापून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षक विशाल काळे, दिलीप गायकवाड, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे, पंच विनय पाटील, पराग पाटील, नावेद खान,प्रशिक जितेधोेर, शेख आवेज शेख आमीन, रोहन पाटील, क्रीडा सचिव पियूष चिंचकर, वैभव लटपटे, जनरल सेक्रेटरी उत्कर्ष भोसले उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button