Education

सावित्रीबाई फुले विद्यालयात ‘कोपरा वाचनालय’ची स्थापना; विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम

सावित्रीबाई फुले विद्यालयात ‘कोपरा वाचनालय’ची स्थापना; विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम

उपक्रमशील शिक्षक अनिल पाटील यांची संकल्पना साकार; वर्गातच विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणार ज्ञानाचा खजिना

अमळनेर-अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कोपरा वाचनालय (कॉर्नर लायब्ररी) ची स्थापना करण्यात आली.
या कोपरा ग्रंथालयाचे उद्घाटन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब डी. बी .पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य पी.एम .कोळी यांनी भूषविले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीमा सुरक्षा बलाचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर आत्माराम बाविस्कर, प्राचार्य डॉ. एस .जे. शेख , रुक्मिणीताई महाविद्यालय, अमळनेर,प्रा. डॉ. कैलास चव्हाण, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, शहादा, एडवोकेट अरुण पाटील, प्रा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज ,धुळे, प्रा.डॉ. राहुल निकम,जुनिअर विभागाचे प्रमुख प्रा.एस. एस. साळुंखे, जुनियर विभागाचे ज्येष्ठ प्रा.एस. एस. पाटील उपस्थित होते . यावेळी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशासकीय अधिकारी आबासाहेब डी .बी. पाटील यांनी अनिल पाटील यांच्या संकल्पनेचा व कार्याचा गौरव करून अशी कोपरा वाचनालयाची संकल्पना संस्थेच्या सर्व शाळांमध्ये राबवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले, व अनिल पाटील यांच्या कार्याचा गौरव केला व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी सर्व प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणातून विद्यार्थी ग्रंथालय संकल्पनचे कौतुक केले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य पी.एम. कोळी यांनी अनिल पाटील यांच्या कार्याचा गौरव करून अशा विद्यार्थीभिमुख कार्याला माझा नेहमी पाठिंबा असतो, असे आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी
चतुर पाटील, कल्याण नेरकर, किरण पाटील, आर. आर. पाटील,नितीन पाटील, विजेंद्र गवळे, दीपक पाटील ,समाधान पाटील, हर्षल बेहरे,रूपाली पाटील, नीलिमा पाटील, अविनाश बाविस्कर आधी उपस्थित होते.
तसेच विद्यार्थी ग्रंथालयाचे
ग्रंथपाल जागृती पाटील, उपग्रंथपाल देवयानी पाटील, अर्चना पाटील, पुस्तक नोंदणी प्रमुख श्रेया पाटील, पुस्तक वितरण प्रमुख निकिता पाटील, सुवर्णा खैरनार, पुस्तक देखभाल प्रमुख प्रगती पाटील, गायत्री पाटील, पुस्तक सुरक्षा प्रमुख सौरभ पाटील, दिव्येश पारधी, ओम पाटील, यश पाटील किशोर देवासी, वर्ग प्रतिनिधी इयत्ता पाचवी राधिका कोळी, इयत्ता सहावी वर्ग प्रतिनिधी चेतन पाटील, उन्नती पाटील, इयत्ता सातवी वर्ग प्रतिनिधी समर्थ पाटील , रितिका पाटील, इयत्ता आठवी वर्ग प्रतिनिधी कार्तिकी पाटील ,गुंजन पवार, प्रणव पाटील ,इयत्ता नववी नम्रता लांडगे, हर्षदा पाटील, हेमलता पवार ,माधवी पाटील इ विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाल हाडपे यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button