Other

बामणोदजवळ अपघात : महा बासुंदी चहावाला तरुण जागीच ठार, दोघे जखमी

महा पोलीस न्यूज । दि.२९ जून २०२५ । रावेरकडून भुसावळकडे येणाऱ्या रस्त्यावर बामणोद ते पाडळसा रस्त्यावर भरधाव एसटी बस आणि दुचाकीची धडक झाल्याची घटना रविवारी दुपारी ६ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ गुळाची महाबासुंदी चहा विक्री करणारा मयूर अण्णा गवळी हा तरुण मित्र जयेश पाटील आणि गोयर असे तिघे आज दुपारी दुचाकीने बामणोद येथे गेले होते. काम आटोपून तिघे दुचाकीने घरी परतत असताना वळणावर एसटी बससोबत त्यांची धडक झाली.

एक जागीच ठार, दोघे गंभीर
अपघात इतका भीषण होता की मयूर गवळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे जागीच निधन झाले. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले होते.

मयुरच्या जाण्याने जळगावातील समाजमन सुन्न
मयूर अण्णा गवळी याचे महाबासुंदी चहाचे दुकान होते. मनमिळाऊ स्वभाव, हसत खेळत चेहरा आणि नेहमी सर्वांना सहकार्य करीत असल्याने मयूरचा सर्वांशी चांगला परिचय होता. तसेच त्याचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता. मयुरच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button