सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची उत्सव नियोजन बैठक उत्साहात


सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची उत्सव नियोजन बैठक उत्साहात
शिस्तबद्ध आणि उत्तम नियोजनाचा उत्सवाचा संकल्प
प्रतिनिधी जळगांव
आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तबद्ध आणि अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्या मार्गदर्शनानुसार सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण उत्सव नियोजन बैठक दि. २४ रोजी गायत्री मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरवातीस भुलेश्वर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेश भक्तांना श्रद्धांजली अर्पण करून श्री गणेश मंत्राने बैठकीला सुरवात झाली यात प्रथम श्री आगमण साठी येणाऱ्या अडचणी तसेच आवश्यक परवानगी साठी लागणारे कागदपत्रे, एक खुडकी योजना संबंधित माहिती नवीन मंडळांना देण्यात आली तसेच मंडळ स्थापना मार्गातील खड्डे यात प्रामुख्याने रिंगरोड वरील मूर्ती कारखाना ते गोकुळ स्वीट चौक मधील व शहराच्या इतर भागातील श्री आगमन दरम्यान अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे आणि आगमन मार्गावरील रस्ते दुरुस्ती संदर्भात त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. महावितरण आरोग्य व स्वच्छता विभाग मनपा यांनी देखील आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करावीत असे आवाहन करण्यात आले येणाऱ्या काळात उत्सवा दरम्यान पुढील बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला महामंडळाचे मुख्य पदाधिकारी, किशोर भोसले, मुनेश बारी समन्वयक सूरज दायमा, किशोर देशमुख अमोल धांडे,विनय बाहेती, राकेश तिवारी, राहुल परकाळे,धनंजय चौधरी, रिंकू चौधरी, विनोद अनपट, चेतन पाटील,अजय बत्तीसे, राहुल सनकत, विकास चौधरी, चेतन सुतार, धीरज पुरोहित,अविनाश भोई, रितेश चौधरी राहुल पाटील, शुभम विंचूरकर,अमर राजपूत कौशल भोसले, भगवान कोळी, मनोज सपकाळे, कार्तिक कुलकर्णी, चेतन नाथजोगी, नितीन कोल्हे, आदित्य कुकरेजा, मीनल पाटील, गणेश आंबोरे, बबलू भोई, नितीन चौधरी, अनुराग सोनार,विजय जाधव,हितेश वाणी, नरेंद्र पाटील,अर्पित भावसार,वैभव जगदाळे, राहुल भोई, पिंटू तापडिया,करण साखला, इत्यादी सह शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.यंदाचा गणेशोत्सव नेहमीपेक्षा अधिक भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असल्यामुळे उत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.







