पळसपूरमध्ये गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा – सुमारे ११.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पळसपूरमध्ये गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा – सुमारे ११.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी)पारनेर तालुक्यातील पळसपूर शिवारातील गायरान परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या पथकाने मोठी कारवाई करत तीन जणांना रंगेहाथ पकडले. कारवाईत सुमारे ११ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशाने पार पडली. कारवाईसाठी पो.हे.का. लोटके, पो.ना. सगर, अशोक ससाणे, पो.का. आकाश काळे, पो.का. विशाल तनपुरे व चासफौ. महादेव भांड यांच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला.
शेडमध्ये पिराजी विहुल आहेर, गोकुळ बाबाजी आहेर व रावसाहेब भगवंत ढोले हे तिघे गावठी दारू तयार करताना आढळले. पिराजी आहेर याने हा व्यवसाय स्वतःचा असल्याची कबुली दिली.
झडतीत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
कच्चे रसायन – २४०० लिटर (मूल्य – ₹९,६८,०००/-)
तयार गावठी दारू – २१० लिटर (मूल्य – ₹२,१०,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल – ₹११,७८,०००/-
उपलब्ध नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५७७/२०२५ अन्वये BNS 2023 चे कलम १२३, २७४, २७५, २(५) सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ)(क)(ड)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू अड्ड्यांची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलीस विभागास कळवावी, अशा अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.