घुसखोरी करणाऱ्या चार बांगलादेशींना धुळ्यातून अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
धुळे प्रतिनिधी :-भारताचे शेजारील देश असलेल्या छुप्या रीतीने भारतात घुसखोरी करून धुळ्यातील एका लॉजमध्ये लपून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रनी दिलेली माहिती अशी की
रोजगार मिळवण्यासाठी चार बांगलादेशी नागरिक यांनी बेकायदा भारतात प्रवेश करून तिथून धुळे शहरात येऊन एका लॉजमध्ये थांबले असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना चार बांगलादेशी नागरिक हे वास्तव्य करून राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासोबत चर्चा करून
पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक प्रकाश पाटील तसेच पथकासह दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक रफिक पठाण यांनी लॉज मधील खोली क्रमांक 122 वर छापा टाकला असता त्यातून मोहम्मद मेहताब बिलाल शेख, शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख, ब्युटी बेगम पोलीस शेख व रिपा रफीक शेख असे चौघे आढळून आले. या चौघांकडे मुंबई येथील रहिवास नमूद असलेले आढळून आले. मात्र त्यांची चौकशी सुरू असताना पोलीस पथकाला त्यांच्या बोली भाषेवर संशय आल्याने त्यांची कसून चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.
हे चौघे बांगलादेश मधील बेहनातुला जिल्हा माहितीपुर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. या चौघांकडे कोणताही भारतात येण्यासाठी लागणारे कागदपत्रे आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी बेकायदा भारतात प्रवेश केला असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे.
यातील महंमद शेख व शिल्पी बेगम हे पती पत्नी असून उर्वरित दोघे महिला महंमद शेख याच्या बहिणी असल्याचे आहेत.
या नागरिकांनी रोजगार नसल्याने रोजगाराच्या शोधार्थ बांगलादेश मधून धुळ्या पर्यंतचा प्रवास केला असून त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत त्यांच्याविरुद्ध
पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या विरोधात पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० कलम ३ ६, परकीय नागरिक आदेश 1948 परीक्षेत तीन (एक), परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 व भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम तीन (पाच) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे त्यांनी जळगाव बांगलादेशी नागरिकांबद्दल बोलताना सांगितले की त्यांच्याकडे भारतात येण्यासाठी लागणारे पासपोर्ट विजा किंवा अन्य कागदपत्र आढळून आले नसून त्यांनी नातेवाईकांसोबत बोलण्यासाठी
आयएमओ हे अॅप वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे चारही नागरिक कुणाच्या मदतीने भारतात धुळ्यापर्यंत आले आणि ते कुणाकुणाची संपर्कात होते याचा तपास सुरू आहे असे त्यांनी सांगितले.