Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, दोन दिवसापासून दर ‘जैसे थे’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमी व गुंतवणूकदारांसाठी आजचे सोने व चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. भंगाळे गोल्ड या नामांकित दालनाच्या माहितीनुसार, जळगाव व सावदा येथील ग्राहकांना शुद्ध सोन्याची हमी, आकर्षक दागिने व विश्वासार्ह सेवा मिळत आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,००,४८५, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०९,७०० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२५,००० इतकाच आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत सोन्याचे भाव वाढले होते, मात्र आज दर स्थिर राहिले आहेत. चांदीचे भावही अपरिवर्तित असल्याने बाजारात शांतता जाणवत आहे.
दररोजच्या सोन्या-चांदीच्या बदलत्या भावांमुळे ग्राहक व गुंतवणूकदार सतत उत्सुकतेने बाजारावर लक्ष ठेवून आहेत. आकर्षक डिझाईन, सर्वोत्तम ऑफर्स व पारदर्शक व्यवहार यामुळे जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड सुवर्णप्रेमींसाठी विश्वासाचे ठिकाण ठरत आहे.





