चांदीचा दर एका आठवड्यात ३५ हजाराने वाढला, सोने १ लाख ३१ हजार पार!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी तेजी कायम असून एका आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल ₹३० हजारपेक्षा जास्त वाढ झाली आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या दरानुसार आज, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी चांदी ₹१,८६,००० प्रति किलो पर्यंत पोहोचली आहे.
त्याचबरोबर सोन्याच्या दरातही वाढ कायम असून जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,३१,००० प्रति तोळा इतका झाला आहे. ग्राहक आणि गुंतवणूकदार यांच्यात दिवाळीपूर्वी सोन्याची खरेदी वाढल्याने बाजारात मागणी तीव्र दिसत आहे.
आजचे दर (Bhangale Gold – Jalgaon & Savda):
• सोने (with GST): ₹१,३१,००० प्रति तोळा
• २२ कॅरेट सोने : ₹१,१५,६०० प्रति तोळा
• २४ कॅरेट सोने : ₹१,२६,२०० प्रति तोळा
• चांदी : ₹१,८६,००० प्रति किलो
तज्ज्ञांच्या मते, सणासुदीचा हंगाम, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांची मोठी मागणी या कारणांमुळे दर वाढले आहेत. दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होताच ही वाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव आणि सावदा येथील ग्राहकांसाठी भंगाळे गोल्ड सतत नवे दर, आकर्षक योजना आणि शुद्धतेची हमी देत असल्याने ग्राहकांचा विश्वास टिकवून आहे.
Rates may change during the day.
(दर दिवसभरात बदलू शकतात.)




