Other

जळगाव पोलिसांच्या ताफ्यात ‘गुरू’ची एन्ट्री! बॉम्ब शोधण्यात पटाईत, पुण्यातून खडतर प्रशिक्षण पूर्ण

४०० पैकी ३७० गुण मिळवून मारली बाजी; संदीप परदेशी अन् निलेश झोपे हँडलर म्हणून तैनात, जिल्ह्याची सुरक्षा आता अधिक मजबूत!

जळगाव पोलिसांच्या ताफ्यात ‘गुरू’ची एन्ट्री! बॉम्ब शोधण्यात पटाईत, पुण्यातून खडतर प्रशिक्षण पूर्ण

४०० पैकी ३७० गुण मिळवून मारली बाजी; संदीप परदेशी अन् निलेश झोपे हँडलर म्हणून तैनात, जिल्ह्याची सुरक्षा आता अधिक मजबूत!

जळगावपोलीस दलाची सुरक्षा यंत्रणा आता अधिक हायटेक आणि सक्षम झाली असून, श्वान पथकात ‘गुरू’ नावाच्या विशेष प्रशिक्षित बॉम्ब शोधक श्वानाचा अधिकृतपणे समावेश झाला आहे. पुणे येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात अत्यंत खडतर असे सहा महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, ‘गुरू’ १५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगावच्या श्वान पथकात दाखल झाला आहे. बेल्जियन मालिनॉइस या अतिशय हुशार आणि चपळ ब्रीडचा असलेला ‘गुरू’ अवघ्या एक वर्षाचा असून, त्याने प्रशिक्षणादरम्यान आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर ४०० पैकी तब्बल ३७० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

‘गुरू’ सोबतच त्याच्या देखभालीची आणि हाताळणीची जबाबदारी असलेले जळगाव पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी (बॅच क्र. ५३४) आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश झोपे (बॅच क्र. १९२६) यांनी देखील पुण्यातील प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षित श्वानाच्या समावेशामुळे जिल्ह्यातील व्हीआयपी दौरे, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे कार्यक्रम, तसेच कोणत्याही संशयास्पद वस्तू अथवा बॉम्बचा शोध घेण्यासाठी जळगाव पोलिसांना मोठी मदत होणार आहे. ‘गुरू’ आणि त्याच्या हँडलर्सच्या पुनरागमा मुळे जळगाव पोलिसांची बॉम्ब शोध व निष्क्रियीकरण शाखा अधिक मजबूत झाली असून सुरक्षा दलाचे मनोबल उंचावले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button