Detection

शेती साहित्य आणि वाहनांची चोरी करणारी टोळी जेरबंद !

१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; निंभोरा LCB पोलिसांची संयुक्त कारवाई

​जळगाव प्रतिनिधी – निंभोरा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेतीमधील साहित्य, वजनकाट्यावरील बॅटरी-इन्व्हर्टर तसेच मोटरसायकल आणि कार चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या टोळीचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.

​गेल्या काही दिवसांपासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर या भागांमध्ये शेतीतले साहित्य आणि वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. या तक्रारींची दखल घेत निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरीदास बोचरे यांनी पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले. गेल्या पंधरा दिवसांपासून या पथकाने नाकाबंदी, रात्रीची गस्त आणि तांत्रिक तपासणी करून या प्रकरणाचा छडा लावला.

असा झाला पर्दाफाश
​पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी विलास उर्फ काल्या सुपडु वाघोदे (रा. वडगाव नदीकाठी) याचा शोध घेण्यात आला. पोलिसांना पाहताच तो पळून गेला, परंतु त्याच्या झोपडीतून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, तिने विलास आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या विविध चोऱ्यांची कबुली दिली.

​या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वप्नील वासुदेव चौधरी (रा. निंभोरा बु.) याला ताब्यात घेतले. त्याच्या गोदामातून आणि घरातून मोठ्या प्रमाणावर चोरीचा माल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ५ एच.टी.पी. पंप, ११ मोठ्या आणि ३ लहान बॅटऱ्या, ७ इन्व्हर्टर, ४ मोटरसायकल, २ लहान पॉवर ट्रॅक्टर, १ नॅनो कार, २ सोलर प्लेट, ११ मटेरियल बॅग्स, आणि ३ बंडल ठिबक नळ्या, तसेच इतर अनेक शेती व इलेक्ट्रिक साहित्याचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे.

१० गुन्ह्यांची उकल, ९ आरोपी गजाआड
​या कारवाईत पोलिसांनी एकूण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये निंभोरा पोलीस स्टेशनमधील ५, यावलमधील २, रावेर, मुक्ताईनगर आणि सावदा येथील प्रत्येकी १ गुन्हा आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एक महिला, गोपाळ भोलनकर, आकाश घोटकर, अर्जुन सोळंकी, जमील तडवी, स्वप्नील चौधरी, राकेश तडवी, ललित पाटील, आणि राहुल उर्फ मयुर पाटील यांचा समावेश आहे. या टोळीचा मुख्य आरोपी विलास वाघोदे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

यांनी केली कारवाई
​ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी हरीदास बोचरे

या कारवाईत निंभोरा पोलीस स्टेशनचे हरीदास बोचरे, पोलीस उउपनिरीक्षकदिपाली पाटील, ममता तडवी, सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, किरण जाधव, रशिद तडवी, सर्फराज तडवी, रफिक पटेल, अमोल वाघ, प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, भुषण सपकाळे, सुभाष शिंदे, योगेश चौधरी, राहुल केदारे यांच्यासह महिला पोलीस अंमलदारांचा सहभाग होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदिप चवरे, प्रदिप सपकाळे, मयुर निकम, सचिन घुगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button