Other

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजी विभागातर्फे शैक्षणिक पॅथॉलॉजी क्विझ स्पर्धा उत्साहात

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे ’मॉर्फोमाइंड २०२६’ या शैक्षणिक पॅथॉलॉजी क्विझ स्पर्धेचे आयोजन डॉ. केतकी पाटील हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या स्पर्धेत हॉजकिन्स हायटेक्स हा विजेता ठरला.

विद्यार्थ्यांमध्ये पॅथॉलॉजी विषयाची सखोल समज विकसित करणे, स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंकी, रजिष्ट्रार प्रमोद भिरूड तसेच पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय बोरोले व प्राध्यापक उपस्थीत होते. स्पर्धेत कूलीज क्युरेटर्स,अस्कानाझी अ‍ॅनालिस्ट्स, काजल्स क्रॅकर्स, ऑस्लर्स ऑसम्स, कूम्ब्स कॉन्क्लेव्ह आणि हॉजकिन्स हायटेक्स अशा सहा संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.स्पर्धेत विविध ज्ञानवर्धक आणि परस्परसंवादी फेर्‍यांचा समावेश करण्यात आला होता. अंतिम फेरीत हॉजकिन्स हायटेक्स संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. अस्कानाझी अ‍ॅनालिस्ट्स संघाने द्वितीय (प्रथम उपविजेता) तर ऑस्लर्स ऑसम्स संघाने तृतीय (द्वितीय उपविजेता) क्रमांक मिळविला.विजेत्या संघांना पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय बोरोले यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सर्व स्पर्धकांनी दाखविलेल्या अभ्यासू वृत्तीचे, टीमवर्कचे आणि उत्साहाचे कौतुक केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे विषयावरील ज्ञान अधिक दृढ होत असून वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टतेसाठी प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.संपूर्ण स्पर्धेचे प्रभावी सूत्रसंचालन व संचालन डॉ. रेशमा वानखेडे आणि डॉ. निकिता ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पॅथॉलॉजी विभागाने सर्व मान्यवर, प्राध्यापक, निवासी डॉक्टर, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ’मॉर्फोमाइंड २०२६’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, स्पर्धा आणि प्रेरणेचा अविस्मरणीय अनुभव ठरली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button