Other

ब्रेकिंग : शनिपेठ पोलीस ठाणे चर्चेत, लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ, निरीक्षकांची कंट्रोलला बदली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात मागील काही दिवसांत घडलेल्या गंभीर घटनांची दखल घेत पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी लाच प्रकरणात अटक झालेल्या पोलीस नाईक विनोद अहिरे यास तात्काळ बडतर्फ केले असून पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

मागील महिन्यात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांपूर्वी एका प्रकरणात पोलीस नाईक विनोद अहिरे याला २ लाख रुपयांची लाच मागत १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली होती.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करत संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर पावले उचलली. तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, आज डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील संवेदनशील घटनांचा आढावा घेत त्यांनी काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलीस दलात शिस्त व पारदर्शकता राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button