CrimeSocial

जलसंधारण सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी रोहन घुगे

जलसंधारण सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील योगदानाच्या स्मरणार्थ २१ ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून,जलसंधारण सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे

जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह अंतर्गत महावॉकेथॉन, ‘एक रिल्स मातीसाठी, एक रिल्स पाण्यासाठी, एक रिल्स सुरक्षित भविष्यासाठी’ या संकल्पनेवर रिल्स स्पर्धेसह विविध उपक्रम होणार आहेत.
त्याअनुषंगाने दि.15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” कार्यक्रमाच्या लोगोचे अनावकरण करण्यात आले तसेच मान्यवरांद्वारे मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात आली. नागरिकांनी महा वॉकेथॉन व रिल्स स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री घुगे यांनी केले आहे.
या रिल्स स्पर्धेत ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील स्पर्धकांना ३० ते ६० सेकंदांची रिल्स तयार करून सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावरप्रसिद्ध करता येईल. माती व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर रिल्स करता येतील. ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकास २५ हजार, द्वितीय १५ हजार आणि तृतीय १० हजार रुपये, तसेच प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

२१ ऑगस्ट २६ रोजी महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून सागर पार्क- ते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परत सागरपार्क असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.महावॉकेथॉनसाठी https://register.mahaevent.co.in या लिंकद्वारे नोंदणी करता येईल. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टी-शर्ट व ‘मी जलदूत’ बॅज देण्यात येणार आहे. महा वॉकेथॉन मधील प्रथम दहा विजेत्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

जलसंधारण सप्ताहासाठी नागरिक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एन सी सी, एन एस एस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सी एस आर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित सहभाग घ्यावा.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button