OtherCrime

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम

जळगाव जिल्ह्यात पोलिसांची वाहतूक नियमभंगाविरोधात धडक मोहीम

ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४९ कारवाया; ५२६ प्रकरणांत २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड

जळगाव, प्रतिनिधी :मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण ५२६ प्रकरणे दाखल करून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी ही मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली.

मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालविण्याच्या ४९ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार इतर ३५६, फॅन्सी नंबर प्लेटची १५, कलम १९४ बी अंतर्गत ३१, तीन सीट प्रवासाची चार, विना परवाना वाहन चालविण्याचे एक, कलम ६६/१९२ अंतर्गत आठ आणि हेल्मेट न वापरल्याची ६२ प्रकरणे नोंदविण्यात आली. अशा एकूण ५२६ प्रकरणांत कारवाई करण्यात आली.

मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे वाहनचालकांसह इतरांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच जळगाव, चाळीसगाव आणि भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या सहभागातून राबविण्यात आली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button