Social

जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’;आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध

जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’;आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध

जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापना मध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता PM NATIONAL APPRENTICESHIP [ MELA] भरती मेळावा शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगांव नॅशनल हायवे नं.६ तंत्र निकेतन समोर जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. हा भरती मेळावा दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आयटीआय शिल्पकारागीर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळा (PM National Apprenticeship Mela)’ चे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत आयोजित या मेळाव्यात जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना थेट अप्रेंटिसशिपसाठी निवडीची संधी मिळणार आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ApprenticeshipIndia.org या वेब पोर्टलवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTIU), जळगाव यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button