
भडगावात अत्याधुनिक ‘नमो गार्डन’चे भूमिपूजन
नागरिकांसाठी आधुनिक विरंगुळा केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये नागरिकांसाठी आकर्षक व अत्याधुनिक ‘नमो गार्डन’ उभारण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांतून साकारत असलेल्या या गार्डनमुळे शहराच्या विकासात आणखी एक सुंदर अध्याय जोडला जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या अत्याधुनिक गार्डनचे भूमिपूजन नगराध्यक्षा रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, पाचोरा पालिकेचे गटनेते सुमित पाटील, भडगाव पालिकेचे गटनेते लखीचंद पाटील, बांधकाम सभापती नगमा बी. अलिम शहा, प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका समीक्षा पाटील तसेच नगरसेवक अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक युवराज पाटील, विजयकुमार भोसले, संतोष पाटील, विशाल पाटील, इम्रानअली सैय्यद, डॉ. प्रमोद पाटील, दुर्गेश वाघ, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील, समाधान पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश भंडारी, शहर प्रमुख आबा चौधरी, बबलू देवरे, जहागीर मालचे, महेंद्र ततार, निशांत सोमवंशी, सागर शेंडे, प्रीतम भंडारी, गौतम मारवाडी यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांसाठी हिरवळ, विरंगुळा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे गार्डन विकसित करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच आकर्षक सौंदर्यीकरणामुळे हे ठिकाण भविष्यात शहरातील प्रमुख आकर्षण ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.






