Other

कुरंगी  जि.प. शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

कुरंगी  जि.प. शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप

पाचोरा प्रतिनिधी  कुरंगी येथील समाजसेवा करण्याची आवड असणारे सेवानिवृत्त स.फौ. भास्कर नथ्थु पाटील यांनी दि. १जूलै २०२६ रोजी वाढदिवसाचे औचित्य साधत जि.प.शाळेत १०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले. व समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित समाजसेवक अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

अशाप्रकारे कार्यक्रमामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फार मोठी मदत होणार आहे.शिक्षण हे एक जिवनाचे महत्त्वाचे अंग आहे.शिक्षणाचा पाया मराठी शाळेत पक्का झाला तर इमारत पक्की होत असते. मी सदैव गरजू विद्यार्थ्यांना यापुढेही मदत करण्याचा संकल्प केला आहे असे मत भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.सदरहू शाळेचे मुख्याध्यापक श्री देसले व गावातील मिडिया पत्रकार अजय जैस्वाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button