Other

जळगावात श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात तीन दिवसीय रामनाम महोत्सव व संक्षिप्त भागवत सप्ताह

३ ते ६ सप्टेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; रामनाम, भागवत कथा व धर्मजागृतीचा भाविकांना लाभ

जळगावात श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात तीन दिवसीय रामनाम महोत्सव व संक्षिप्त भागवत सप्ताह

३ ते ६ सप्टेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; रामनाम, भागवत कथा व धर्मजागृतीचा भाविकांना लाभ

जळगाव : श्रावण मासाचे औचित्य साधून रविंद्र नगर, मोहाडी रोड येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिर परिसरात साडेतीन दिवसीय रामनाम महोत्सव व संक्षिप्त श्रीमद् भागवत निरूपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक संस्कार, नामस्मरण आणि धर्मजागृतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने या आध्यात्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात सात सत्रांमध्ये संक्षिप्त श्रीमद् भागवत निरूपण करण्यात येणार असून भाविकांना रामनाम, भागवत कथा, अध्यात्म आणि धर्मजागृतीचा लाभ घेता येणार आहे. श्री राया उपासनी निजामपुरकर हे भागवत निरूपण करणार आहेत.

३ ते ६ सप्टेंबरदरम्यान कार्यक्रम

कालावधी : ३, ४, ५ व ६ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी ३ ते ५
स्थळ : श्री सर्वेश्वर महादेव मंदिर परिसर, रविंद्र नगर, मोहाडी रोड, जळगाव.

या धार्मिक महोत्सवाचे आयोजन श्री सर्वेश्वर महादेव मंदिर समिती व महिला मंडळ, रविंद्र नगर, जळगाव तसेच श्री नित्यानंद संस्थान, निजामपूर, ता. साक्री, जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. श्री नित्यानंद संस्थानच्या माध्यमातून नामप्रचार, अन्नसंतर्पण, गौ-अनुसंधान आणि धर्मजागृतीचे कार्य केले जाते.

दर सोमवारी महादेवाची आरती व प्रसाद

श्रावण महिन्यात मंदिर समितीच्या वतीने दर सोमवारी सकाळी ८ वाजता श्री महादेवाची आरती व विधिवत पूजा करण्यात येत आहे. पूजेनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक उपक्रमाला परिसरातील शिवभक्त आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रामनाम महोत्सव व भागवत सप्ताहाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता समारोपाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांना आध्यात्मिक कार्यक्रमासोबत महाप्रसादाचा लाभ मिळावा, यासाठी मंदिर समिती व महिला मंडळाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.

श्री सर्वेश्वर महादेव मंदिर कार्यकारिणीत महेश पाटील – अध्यक्ष, योगेश पाटील – उपाध्यक्ष, रोहन भावसार – सचिव, विनय नेहेते – सहसचिव, सिद्धांत माळी – खजिनदार यांच्यासह किशोर इंगळे, पंकज बहऱ्हाटे, योगेश पाटील, दीपक तायडे, आदित्य जाधव, राहुल ढाके, प्रशांत साळुंखे आणि गौरव चौधरी सदस्य आहेत.

भागवत सप्ताह महिला कार्यकारिणीत मंगला पाटील, आशा सपकाळे, ज्योत्स्ना बहऱ्हाटे, दिपाली पाटील, मनीषा तायडे, वैशाली पाटील, पूजा किशोर इंगळे, वैशाली भामरे, जयश्री बहऱ्हाटे, छाया सोमाणी, कल्पना तळेले, दिपाली जोशी आदींचा समावेश आहे.

या धार्मिक महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समिती व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button