OtherSocial

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे भक्तिमय वातावरण; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त पद्मालय गणपती मंदिरात पहाटेच्या मंगल वातावरणात विशेष धार्मिक विधी पार पडले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती करण्यात आली. पहाटे सुमारे ४ वाजता सुरू झालेल्या या पूजेमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

पद्मालय हे गणपतीचे प्राचीन व जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. येथे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. अंगारकी चतुर्थी व संकष्टीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

देवस्थान ट्रस्टच्या निमंत्रणावरून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विधिवत पूजा व आरती केली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधी पार पाडले.

पूजेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचा इतिहास व सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विश्वस्त व मान्यवरांसह तहसीलदार, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी सावलीचे मंडप, कुलर व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

अंगारकी चतुर्थी निमित्त पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button