भुसावळ तालुका शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात

भुसावळ– महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय तालुकास्तरीय मुला, मुलींच्या 14, 17, 19, वर्ष वयोगटाच्या कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन शा.पो.आ. अधीक्षक बि.डी. धाढी, यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्यां नीना कटलर अध्यक्षस्थानी होत्या. प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुका क्रीडा समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, वंदना ठोके, विजय संकेत ,सर्व खेळाडू क्रीडाशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटक बी.डी. धाडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमच्या खेळातील प्रत्येक शॉट अचूक आणि ध्येय गाठणारा असो.
“चिकाटी आणि मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
“आत्मविश्वास ठेवा आणि खेळाचा आनंद घ्या. “तुमच्या खेळातील प्रत्येक चढ-उतार तुम्हाला अधिक मजबूत बनवो.
“कॅरम खेळ हा केवळ जिंकण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो शिकण्याचा आणि टिकून राहण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही खेळातील सर्व बारकावे आत्मसात करा आणि खेळाचा पुरेपूर आनंद घ्या. त्यांनी खेळाडूंचे सहभागाबद्दल अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी व विजया साठी सर्वं खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे १४ वर्षाआतील मुले
बागवान अनुशर रौफ
जुनैद शेख शफिर खाटीक,
सय्यद फैसल सय्यद मोहमोद्दीन,
जयेश किरण भोगे,
काझीम जुबेर अहमद खाटीक,
सय्यद जाकी सय्यद रियाज.
१७ वर्षाआतील मुले
मोहम्मद कोहेन ऐजाज खान
अरफिन मुख्तार हुसेन मिर्झा,
सम्यक नरेंद्र वाघ.,
रिझवान शेख नूर तांबोळी,
अम्मर नदीम बागवान,
सागर रामचंद नागदेव.
१९ वर्षातील मुले
रय्यान खान फिरोज खान,
मोहम्मद हसनैन शेख रफिक खाटीक,
फैगयान मुरुद्दीन शेख
मोहम्मद मुसिक जया उद्दीन शेख
मोहम्मद फरान अब्दुल शकूर बागवान
मोहम्मद सुफिया नवाज शेख 14 वर्षातील मुली , तहुरा नदिम बागवान , 2) अकसा फिरोज खाटीक ,
(3) कृष्णाली मनोज बऱ्हाटे,
(8) किर्ती महेश सुतार ,
(५) तुबा शेख अखलाक अहमद,
(६) उर्वी मंगेश धानोरकर , १७ वर्षातील मुली
(1) खनसा अब्दुल कलाम अब्दुल ,
2) मारिया मोहम्मद इरफान खान,
(3) शिरिन सोहराब खान,
४ )वांशिका आकाश मद्दु,
(5) एलिजा बी अमजद खान ,
(6) चांदनी संतोश आंबोडकर .
१९ वर्षाआतील मुली
(1) फिजा जम्माल अब्दुल कादिर शेख,
(2) सायमा कमैसरसलीम खान,
(3) शिफा नाज अकरम खान,
(४) अकसा परविन मो व्यासिम, बागवान, ५) मिसबाह बानो उपसिफ श्याह,
६) अरिबा राहिन नुरुलशह कुरेशी,
पंच म्हणून भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शना खाली सय्यद अजहर अली, विजय संकेत,मनोज वारके , वंदना ठोके, अश्विनी पाल, सुनिल चौधरी, रितुराज चौधरी, शेख रफिक, सुमितदास गुप्ता, शेख अकबर शेख बाबू,, तौसिफ कुरेशी, मसकफीयत शेख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व ताप्ती स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सुनील चौधरी यांनी केले






