गुरुपौर्णिमानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” विषयावर व्याख्यान
महा पोलीस न्यूज । दि.२२ जुलै २०२४ । गुरुपौर्णिमानिमित्त रविवारी २१ जुलै रोजी जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघ जळगाव शाखेतर्फे आणि माऊली योगा क्लासच्या वतीने जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील सिद्धार्थ लॉन येथे रविवार दि.२१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुरुपौर्णिमानिमित्त महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन नुरोसर्जन डॉ.राजेश जैन यांचे महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” या विषयावर व्याख्यान घेण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असलेले नुरोसर्जन डॉ.राजेश जैन यांनी यावेळी उपस्थित त्यांना “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर जैन यांनी “जीवनात जगत असताना मनुष्याने काय केले पाहिजे,आणि काय नाही केले पाहिजे, तसेच जीवनात घेतलेले ज्ञान इतरांना देऊन तो कसा फायदा करता येईल, याचा विचार करावा, कारण शेवटच्या क्षणाला आपण आपण जीवनात घेतलेले ज्ञान जाताना वाटून जावे. म्हणजे घेताना घेत राहावे, आणि देताना देत रहावे अशी साधी उदाहरणे देऊन जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. याचबरोबर डॉक्टर अभय गुजराती यांनी देखील महामुनी पतंजली यांच्या संदर्भात माहिती व्यक्त करत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरुवात ओमकार यांनी करण्यात आली. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांच्या परिचय देऊन त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान गुरुपौर्णिमा असल्या कारणामुळे यावेळी योगशिक्षक आणि योगसाधक यांनी गुरु आणि शिष्याची परंपरा कायम ठेवत शिष्यांनी गुरूच्या पायात लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गुरु असलेले शिक्षकांनी देखील त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षिका अर्चना गुरव यांनी केले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सदस्य तसेच योग गुरु हेमांगी सोनवणे, अरविंद साफकर तसेच सुभाष जाखेडे यांच्यासह महाराष्ट्र योग शिक्षण संघाचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि सन योगा क्लासेस योग साधक, माऊली योगा क्लासेस चे योग साधक यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.