सुनील महाजन यांचे तीनही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

जळगाव प्रतिनिधी : महापालिकेच्या भंगार साहित्य चोरी प्रकरणातील मुख्य संशयित असलेले महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांमध्ये त्यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केले होते. मात्र सोमवारी न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
मनपा विरोधीपक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांच्यासह सात जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गिरणा पंपिंग येथील शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी ब्रिटिशकालीन बिडाच्या पाईपांसह भंगार साहित्य चोरी प्रकरणी गुन्हा दाखल असून तालुका पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी चार जणांना देखील अटक करण्यात आले असून संशयित सुनील महाजन हे अद्याप फरार असल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे मात्र त्यांनी या तीनही गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन वेळा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन दिवस झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.