EducationPoliticsSocial

भडगाव येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची भेट

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । नाशिक पदवीधर विधान परीषद मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात दि.२२ रोजी रविवारी दुपारी ३ वाजता भेट दिली. विविध संघटांसह नागरीकांमार्फत आमदार सत्यजीत तांबे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. व सविस्तर चर्चा विनीमय करण्यात आली. आमदार सत्यजीत तांबे यांनी आपण आपल्या मागण्यांनुसार पुरेपुर प्रयत्न करुन प्रश्न मार्गी लावण्याचा शासन दरबारी प्रयत्न करु असे सांगीतले.

यावेळी भडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी नगर सेविका योजना पाटील, भुषण पवार, विवेक पवार, भारतीय कांग्रेसचे सेवादलाचे जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, दिलीप शेंडे, राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे भडगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील, भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.आर. पाटील, व्हाईस ऑफ मिडीया पञकार संघाचे भडगाव अध्यक्ष अशोक परदेशी, स्वप्नील निकम, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.निलेश तिवारी, पेंडगाव धोंडु पाटील पहीलवान, ॲड.भरत ठाकरे, साहेबराव पाटील, प्रतिक पाटील यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरीक, तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी आमदार सत्याजित तांबे यांचा जेष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन, सागर महाजन, भुषण पवार, विवेक पवार यांनी सत्कार केला. यावेळी आ.सत्यजीत तांबे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात महाराष्ट्र पोलीस शिपाई सन २०२५, २०२६ साठी भरती प्रक्रीया सुरु करण्याबाबत शहरातील असंख्य तरुणांनी निवेदन दिले. तसेच एस.आर.पी.एफ.जी.आर. प्रतिक्षा यादी लवकरात लवकर स्पष्ट करावी या मागणीचे निवेदन शेख शब्बीर यांनी दिले.

तसेच भडगाव येथील माहेरवाशीण शारदा उर्फ पुजा माळी हिचा अमानुषपणे छळ करुन खुन केला. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. ही केस धुळे जिल्हयातील न्यायालयात न चालवता ती जळगाव येथील फ़ास्टट्रक न्यायालयात वर्ग करण्यात यावी. या केसचा तपास पोलीस दलातील पोलीस अधिकारी दर्जाच्या महिला अधिकारीकडे वर्ग करण्यात यावा. या मागणीचे निवेदन या मयत महिलेच्या कुटुंबामार्फत साहेबराव महाजन यांचेसह परीवारामार्फत देण्यात आले.

भडगाव नगर परीषद संचलीत अभ्यासीकेकरीता विविध उपयोगी साहित्य खरेदीकरीता अनुदान मंजुर होणेबाबत भडगाव नगर परीषदेचे मागणीचे पञ यावेळी लिपीक नितीन पाटील यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना दिले. तसेच पञकार अशोक परदेशी यांनीही विविध मागण्या मांडुन सविस्तर चर्चा केली. तसेच भडगाव येथील पञकार स्व.सुनिल कासार यांचे दुखद निधन झाल्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी शोक संवेदना व्यक्त करण्यासाठी कासार कुटुंबियांची प्रत्यक्षात जाऊन घरी भेट घेतली व परीवाराचे सांत्वन केले. कुटुंबियांना भविष्यात योग्य ती मदत करु असे आश्वासन आमदार सत्यजीत तांबे यांनी दिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button