मोहाडी महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे साहित्य चोरी, गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज | ५ मार्च २०२४ | जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी शिवारातील शासकीय महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे साहित्य चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणेशवाडी परिसरात राहणारे आयुष कमलकिशोर मणियार वय – २६ यांनी मोहाडी गट क्रमांक २, लांडोर खोरी उद्यानाच्या पुढे शासकीय महिला रुग्णालयाच्या बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. दि.२ मार्च सायंकाळी ६ ते दि.४ मार्च सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बांधकाम साईटवरील बॅटरी, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी, ब्रेकर मशीन, केबल स्टार्टर असा एकूण १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
आयुष कमलकिशोर मणियार वय – २६ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.