काकर समाजाच्या सामूहिक विवाह साेहळ्यात सात जाेडपे विवाहबद्ध

महा पोलीस न्यूज | ४ मार्च २०२४ | जळगावात मुस्लिम काकर समाजाने सामुहिक विवाह साेहळा घडवून घडवून आणला. आपल्या कृतीतून त्यांनी समाजातील गरजूंची मदत केलेली आहे. विवाह सोहळ्याचा खर्च सामान्य कुटुंबाला आज परवडणारा नाही. काकर समाजाचे हे समाज हितकारी कार्य खरचं काैतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डाॅ.निलेश चांडक यांनी केले. ते येथील काकर समाजातर्फे आयोजित सामूहिक विवाह साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते.
काकर समाजाच्या विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गणेश साेनवणे, अशाेक लाडवंजारी, विक्की बजाज, वरिष्ठ पत्रकार वाहिद काकर, राजु बर्तनवाला आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रियाज काकर यांनी सांगितले की, आजचा हा पाचवा सामुिहक विवाह साेहळा आहे. समाज संघटनेतर्फे समाजातील गरजू व्यक्तींना नेहमीच मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न असताे. त्याचप्रमाणे एखाद्या गरजू व्यक्तीला जोखमीच्या आजाराच्या वेळी त्याला सरकारी याेजनेसह शक्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असताे. यासह गरजू व्यक्तींना शैक्षणिक साहित्य माेफत वाटप करणे, रेशन कार्ड बनवणे, गरजूंसाठी माेफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. समाजबांधवांची कायम साथ राहिली तर आणखी बरेच उपक्रम समाजासाठी राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन फारुख अमीर काकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कौसर काकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काकर समाजाचे पंच माेहसीन युसुफ काकर, कौसर काकर, हुस्नाैद्दीन काकर, मुश्ताक गुलाब काकर, विक्की अख्तर काकर, रफीक चांद, वसीम सट्टा, बबलू यांच्या मार्गदर्शनात इतरांनी परिश्रम घेतले. प्रसंगी सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांचा सत्कार करण्यात आला.