Other

कवी राधेशाम कंडारे यांना ‘शब्द प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

कवी राधेशाम कंडारे यांना ‘शब्द प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

ओझर (नाशिक) : बी. एस. एफ. बहुउद्देशीय संस्था व संत कबीर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शब्दांच्या पलीकडे’ या पहिल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात कवी राधेशाम कंडारे यांना ‘शब्द प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

मराठी साहित्य, कविता आणि सामाजिक जाणिवांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या गौरवाबद्दल साहित्यप्रेमी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी आपणीच पुस्तकांचं हॉटेल, ओझर (जि. नाशिक) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण नितीन सरदारे आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल कवी राधेशाम सुरेखा अशोक कंडारे यांचे सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button