पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण करीत लुटले!

जळगाव शहरातील घटना: चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी:-पाणीपुरी विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून जबरदस्तीने दोन हजार रुपये स्काउन नंतर लाकडी दांडका आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना खोटे नगर रिक्षा स्टॉप जवळ 4 जनेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चौघां विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम हकीमचंद यादव वय 28 रा. खोटे नगर असे या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव असून तो . 4 रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरी विक्री करण्यासाठी उभा होता. यावेळी संशयित गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत, गोलू पाटील यांनी दुचाकीवरून येत यातील दादू कोळी याने लोखंडी कोयता काढून गौतम यादव याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली गौतम याच्यात जवळून दोन हजार रुपयांची रोकड हिसकावली. मात्र या चौघांनी गौतम यादव याला बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी गौतम यादव याने त्या ठिकाणावरून पळ काढला असताना चौघांनी त्याचा कोयता घेऊन पाठलाग करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .
याप्रकरणी गौतमने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्या वरून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.