Crime

अमळनेर-पारोळ्यात राज्य उत्पादन शुल्क  विभागाची धडक कारवाई

अमळनेर-पारोळ्यात राज्य उत्पादन शुल्क  विभागाची धडक कारवाई

हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे; ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त, मोठ्या प्रमाणात रसायन नष्ट

अमळनेर | प्रतिनिधी

पुणे येथे घडलेल्या मद्यप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा तालुक्यात अवैध मद्यनिर्मिती आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. अमळनेर तालुक्यातील गांधली व नांदेड तसेच पारोळा तालुक्यातील चिखलोद आणि शेडावे परिसरातील हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात रसायन, गावठी दारू आणि ताडी जप्त करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. छाप्यामध्ये ६ हजार ६० लिटर रसायन, १९४ लिटर ताडी, १०० लिटर गावठी दारू तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ७६ हजार ९४० रुपये इतकी असल्याची माहिती विभागाने दिली.

कारवाईदरम्यान आढळून आलेले रसायन मानवी आरोग्यास घातक तसेच वाहतुकीस अयोग्य असल्याने ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. अवैध मद्यनिर्मितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कारवाईनंतर संबंधित आरोपींना सूचनापत्र देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यामध्ये चोपडा विभागाचे निरीक्षक कय्युम मोमीन, पारोळा विभागाचे निरीक्षक आर. के. फुसे, अमळनेर विभागाचे निरीक्षक गोपाल मोरे तसेच जवान डी. एन. पाटील, शशिकांत पाटील आणि भूषण परदेशी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक गोपाल मोरे करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button